अहिल्यानगर
विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा प्रसन्ना धुमाळ यांना मिळालेला पुरस्कार प्रेरणादायी-पत्रकार प्रकाश कुलथे
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : महात्मा गांधी यांचा आदर्श समोर ठेवून सुकदेव सुकळे यांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानची स्थापना केली व विविध उपक्रम राबवीत आहे. श्रीरामपूर येथील उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील सुमुपदेशक तथा जनसंपर्क अधिकारी प्रसन्ना प्रकाश धुमाळ यांना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा स्व.डॉ वा.ग.कल्याणकर तथा बाबासाहेब कल्याणकर स्मृती सेवाभावी धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे अतिशय भूषणावह बाब असल्याचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी यावेळी मत व्यक्त केले.
येथील विश्वलक्ष्मी ग्रा.प्रतिष्ठान कार्यालयात स्व.डॉ वा.ग.कल्याणकर यांची ११२ वी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने प्रसन्ना धुमाळ यांना सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान कार्यक्रमात पत्रकार प्रकाश कुलथे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ प्रकाश मेहेकरकर हे होतेे. यावेळी स्व.नामदेवराव सुकळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्व.डॉ कल्याणकर व स्व.नामदेवराव सुकळे यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिष्ठान संस्थापक सचिव व संयोजक विश्वनाथ सुकळे यांनी माझा भाऊ नामदेवराव सुकळे याविषयी भावपूर्ण चरित्रपट मांडला. प्रतिष्ठानचे समन्वयक व मार्गदर्शक साहित्यिक डॉ बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत व प्रास्तविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी आशाताई दिगंबर कल्याणकर, सौ पुष्पाताई सुकदेव सुकळे, सौ उज्वला बाळासाहेब बुरकुले, सौ सुरेखा संजय बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, संजय कल्याणकर, सुरेश निकाळे, सुदामराव औताडे, पत्रकार बाबासाहेब चेडे, सुरेश बुरकुले व कुटुंबीय उपस्थित होते.
पत्रकार प्रकाश कुलथे यांनी सुकदेव सुकळे व विश्वलक्ष्मी ग्रा.प्रतिष्ठान यांच्या सामाजिक सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. डॉ कल्याणकर यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील आठवणी सांगितल्या. स्व.नामदेवराव सुकळे व सुकदेव सुकळे यांचे बंधुप्रेम म्हणजे आजच्या काळामध्ये आदर्शवत असे आहे. आपल्या जीवनावर ज्यांचा प्रभाव आहे ही ऋणात्मक भावना ठेवणारे सुकदेव सुकळे हे माणुसकी संपन्न व्यक्तिमत्व आहे, असे कुलथे यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ प्रकाश मेहेकरकर यांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करून असे उपक्रम नव्या पिढीला प्रेरणा देतात. डॉ कल्याणकर व स्व.नामदेवराव सुकले यांच्या आठवणी सांगितल्या तसेच प्रमुख पाहुणे हे प्रकाश कुलथे हे पत्रकार क्षेत्रातील निरपेक्ष व आदर्श असे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्वाचा मला अभिमान वाटतो असे सांगितले. सत्कारमूर्ती प्रसन्ना धुमाळ यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की डॉ कल्याणकर यांच्यासारख्या नावाचा सेवाभावी व्य्कीमात्वाच्या नावाने मिळालेला पुरस्कार मला सदैव प्रेरणा देईल असे सांगून आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. सूत्र संचालन प्रा.बाबुराव उपाध्ये यांनी व आभार प्रदर्शन सुदामराव औताडे यांनी केले.