अहिल्यानगर
आ.संग्राम जगताप यांनी मा. नगरसेवक निखिल वारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रस्त्यांच्या कामासाठी दिला भरघोस निधी
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : सण-उत्सव, वाढदिवस साजरे करीत असताना आपण सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत समाज उपयोगी कार्यक्रम राबवावे. मा. नगरसेवक निखिल वारे हे नेहमीच विकास कामांबरोबरच समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असतात, शहरांमध्ये सध्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे या दृष्टिकोनातून पावले उचलली असून रस्त्यांची कामे टप्प्या-टप्प्याने हाती घेतले आहे.
मा.नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेवक सुनील त्रिंबके, मा.नगरसेवक बाळासाहेब पवार हे नेहमीच प्रभागातील विकासाच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करत असतात. या माध्यमातून निखिल वारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुलमोहर रस्ता डांबरीकरणासाठी मनपाच्या माध्यमातून 3 कोटी 97 लाख 36 हजार 842 रुपये व पाईपलाईन रोड कामासाठी 3 कोटी 25 लाख 99 हजार 119 रुपये तसेच श्रीराम चौक ते गुलमोहर रोड पोलिस चौकी पर्यंतच्या शीला विहार रस्त्यासाठी 30 लाख 83 हजार 700 रुपये इतका निधी मंजूर करून वाढदिवसाची आगळीवेगळी भेट सावेडी उपनगरातील नागरिकांना दिली आहे. विकास कामांनाच प्राधान्यक्रम दिला असून यापुढील काळात टप्प्याटप्प्याने शहरातील विकास कामे मार्गी लागतील असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
मा.नगरसेवक निखिल वारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुलमोहर, शीला विहार व पाईपलाईन रोडच्या कामांसाठी सुमारे 8 कोटी रुपयेचा भरघोस निधी उपलब्ध करून देऊन यांचा सत्कार करताना आ.संग्राम जगताप समवेत प्रा.माणिकराव विधाते, विनित पाऊलबुधे, बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके, अरुण शिंदे, संभाजी पवार, उबेद शेख, सचिन जाधव, बाळासाहेब जगताप, अजय औसरकर, स्वप्नील वारे, सचिन वारे, बाप्पू गायकवाड, युवराज बार्शीकर, रुपेश यादव, सचिन अकोलकर, श्रीनिवास कासार, विनीत पोकळे, रोहन फरतारे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आ.संग्राम जगताप यांनी सावेडीतील नागरिकांना रस्त्यांचा विकास कामासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला यासाठी मी त्यांचा आभारी आहे. सार्वजनिक जीवनामध्ये समाजाप्रती काम करीत असताना आ.संग्राम जगताप यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढील वाटचाल करीत असतो, प्रभागातील नागरिकांच्या विकास कामासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहे असे ते म्हणाले.