अहिल्यानगर
चिखलठाणवाडी येथे शिवसेना, युवासेना शाखेचे तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या हस्ते उद्घाटन
श्रीगोंदा प्रतिनिधी/ सुभाष दरेकर : हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री श्रीमान आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घर तेथे शिवसैनिक गाव तिथे शाखा हे अभियान घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शिवसैनिक, युवा सैनिक श्रीगोंदा शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेत आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम तालुका प्रमुख या नात्याने बाळासाहेब दुतारे करीत आहेत. आता एकच लक्ष श्रीगोंदा तालुक्यात गाव, खेडे, वाडी वस्ती फक्त शिवसेना पक्ष हे संकल्पना घेऊन सर्व शिवसैनिक काम करीत आहेत.
येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा झंजावात निर्माण केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाहीत अशी गर्जना शिवसेना ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख यांनी केली. भूतो ना भविष्य प्रथमच असा युवा धाडशी आणि क्रियाशील धडाडीचा कामदार तालुकाप्रमुख शिवसेनेला लाभला आहे. चिखलठाणवाडी येथे शिवसेना युवासेना शाखा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. शाखा प्रमुख शिवसेना सचिन चिखलठाणे, उपशाखा प्रमुख शिवसेना भूषण चिखलठाणे, युवासेना शाखा प्रमुख सुनिल केसकर, युवा सेना उपशाखा प्रमुख सौरभ चिखलठाणे यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, शिवसेना ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख, युवा सेना तालुका प्रमुख निलेश गोरे, पेडगाव युवासेना गण प्रमुख संतोष चिकलठाणे, युवासेना उपशहर प्रमुख जयराज गोरे, ओबीसी उपशहर प्रमुख किरण बनसोडे, शिवसैनिक युवा सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.