अहिल्यानगर
महाराष्ट्र युवा खेल परिषदेच्या राज्य महासचिव पदी प्रा. सुर्यवंशी यांची निवड
राहुरी : संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र युवा खेल परिषदेच्या जिल्हा सचिवांच्या एजीएम बैठकीत प्रा. पुरब सुर्यवंशी यांची महाराष्ट्र युवा खेल परिषदेच्या महाराष्ट्र राज्य महासचिव पदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर सुर्यवंशी यांचा सर्व जिल्ह्यांचे जिल्हा सचिव व खेड परिषदेचे पदाधिकार्यांनी सत्कार केला.
महाराष्ट्र युवा खेळ परिषदेचे अध्यक्ष कल्याण जाधव पाटील, महाराष्ट्र युवा खेळ परिषदेचे उपाध्यक्ष शंकर गायकवाड, खजिनदार प्रा. श्रीकांत पाटील, महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर हेड प्रा. निलेश वाकचौरे, छत्रपती पुरस्कार विजेते मुंबई शहराचे वायजीसीएम जिल्हा सचिव श्री करमळकर, छत्रपती पुरस्कार विजेते मुंबई चे शरद वाबळे, पुणे जिल्हा सचिव श्री काळभोर, यवतमाळचे सचिव श्री लांजेवार, डायरेक्टर तथा सचिव अमरसिंह राणा, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे पाटील, प्रा. प्रकाश यशवंत सूर्यवंशी, हॉलीबॉल खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच आदिनाथ कोल्हे आदींसह मान्यवरांनी सुर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.