अहिल्यानगर
महेश दिघे यांचा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या हस्ते सत्कार
धानोरे : महेश दिघे यांचा सत्कार करताना अरुण कडू पाटील, बापुसाहेब दिघे आदी मान्यवर…
राहुरी प्रतिनिधी : तालुक्यातील धानोरे येथील महेश दिघे यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या हस्ते महेश दिघे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भास्करराव फणसे, सुर्यभान दिघे, बापूसाहेब दिघे, आदिनाथ दिघे, सुनिल ताजणे, भागवत दिघे, याकुबभाई तांबोळी, कैलास कडू, महेश भालेराव आदि उपस्थित होते.