अहिल्यानगर

वणी येथून आलेल्या नवरात्र ज्योतीचे शिरसगावात स्वागत

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : सालाबादप्रमाणे यावर्षीही शिरसगावमध्येही नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. तरी आज शिरसगाव येथे प्रवेशव्दाराजवळ तीस ते चाळीस युवकांनी श्री क्षेत्र देवस्थान वणी येथून आणलेल्या मशाल ज्योतीचे सकाळी जंगी स्वागत करण्यात आले.


त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, महिला, देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागोजागी पूजन, पाण्याचा सडा टाकण्यात आला होता. ही मशाल ज्योत ज्यावेळी गावाच्या शिवेजवळ आली त्यावेळी त्या ज्योतीचे श्री व सौ शांताराम पाटील गवारे, तसेच भाऊसाहेब जाधव व पत्नी या दोन जोड्यांनी औक्षण करून स्वागत केले. त्याप्रसंगी गणेशराव मुद्गुले, सुरेश ताके, लक्ष्मणराव यादव, एम डी जाधव, बाळासाहेब गवारे, कचरू बढे, सीताराम धनाड, मुळे, निलेश यादव, नितीन गवारे, अमोल जानराव, केदार यादव, विजय त्रिभुवन, देवीचे सर्व भक्त मंडळ, दत्ता जाधव, अशोरव पवार आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button