अहिल्यानगर
काळूबाई येथून आलेल्या नवरात्र ज्योतीचे उत्साहात स्वागत
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : वरवंडी गावाचे आराध्य दैवत लक्ष्मी माता मंदिर असुन खडकवाडी येथील जय माता दि मिञ मंडळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्योत आणण्यात येते.
आत्तापर्यंत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठ मुंबादेवी, काळुबाई, तुळजापूर तसेच अनेक तीर्थक्षेत्रावरून ज्योत आणण्यात आली आहे. यावर्षी ज्योत आणण्यासाठी मांढरदेव (काळूबाई) ते वरवंडी असा प्रवास करीत पायी ज्योत आणण्यात आली. तरूण मंडळाने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. ज्योत वरवंडी येथे आली असता त्याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष संतोष थोरात, भास्कर काळे, संभाजी गर्दे, रामनाथ कोळेकर, सरपंच भाऊसाहेब कोळेकर, दादा पवार, कृष्णा थोरात, अक्षय पवार, अजय बर्डे, उत्तम शिंदे, राजु शिगांडे, अमोल बर्डे, बाळु पवार, दत्तु थोरात, दत्तु बर्डे, करण बर्डे, पप्पु जाधव, साहील पवार, अमोल साळवे, गणेश साळवे, राहुल शिंदे, राजु शिंदे, प्रदीप शिंदे, संतोष शिगांडे, सोन्यबापु गर्दे, गणेश माने, नवनाथ बर्डे, संदीप पवार, बाळासाहेब तोंडे आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.