अहिल्यानगर

देवळाली प्रवरा येथील नियमबाह्य पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त; मागणी मान्य झाल्याने उपोषण स्थगित – ढुस

देवळाली प्रवरा : येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे नियमबाह्य पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करण्यात आल्याने आप्पासाहेब ढुस यांनी उपोषण स्थगित केले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, उपोषणाच्या एक दिवस आधी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाने प्राचार्यांना बरखास्तीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना शाळेत स्वच्छ व निर्भय वातावरण निर्माण करून देणेसाठी व तेथे असलेल्या नियमबाह्य पालक शिक्षक संघ रूपी राजकीय जोखडातून शाळेला मुक्त करणेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडु आप्पासाहेब ढुस यांनी नियमबाह्य पालकशिक्षक संघ तसेच शाळा व्यवस्थापन समीती बरखास्त करणे बाबत मागणी केली होती.

शिक्षण अधिकारी अहमदनगर यांनी आदेश देऊनही आणि मागणीला महिना दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही कार्यवाही होत नसल्याने अखेर शासन निर्णयाचा अवमान व शिक्षण अधिकारी यांचे आदेशाची पायमल्ली होत असल्याने ढुस यांनी दि. ७ ऑक्टोबर घटस्थापनेपासुन शाळेसमोर उपोषणाचा निर्णय घेेतला होता. या उपोषणांस देवळाली प्रवरा हेल्प टीमनेहि पाठिंबा दर्शविला होता. हेल्प टीमचे दत्ता कडु पाटील व विद्यालयाचे प्राचार्य यांच्यात बैठका होवुन, उपोषणावर ठाम असलेले आप्पासाहेब ढुस व संस्थेच्या पदाधिकारी यांच्यात समन्वय करत केलेली शिष्टाई यशस्वी झाली. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेने त्यांचे कार्यकारी मंडळात सदर पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापान समिती तात्काळ बरखास्त करुन नियमानुसार पालक सभा बोलावुन नवीन पदाधिकारी निवडण्याचे आज प्राचार्यांना आदेश दिले. त्यामुळे प्राचार्य व हेल्प टीमचे दत्ता कडुपाटील यांचे विनंतीस मान देवुन व मागणी मान्य झाल्याने आप्पासाहेब ढुस यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

बरखास्त झालेला पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितिचे कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे…
पालक शिक्षक संघ कार्यकारीणी :-
माजी आमदार चंद्रशेखर कदम, अध्यक्ष – गोरख गजाबापू मुसमाडे, उपाध्यक्ष – मच्छिंद्र कारभारी कदम, सेक्रेटरी – बाबासाहेब गेनूजी चव्हाण, सह सेक्रेटरी – मुकुंद बापूसाहेब चव्हाण, सदस्य – राजेंद्र शिवाजी कदम, मुरलीधर जगन्नाथ कदम, शिवाजी बाबुराव मुसमाडे, प्रियतमा चंद्रशेखर कदम, गणेश गोरक्षनाथ अंबिलवादे, बाबासाहेब सोपानराव वाळुंज, अशोक रावसाहेब शेटे, गौतम पाराजी भागवत, सुजाता कदम, किशोर शिवाजी तोडमल, भाऊसाहेब गेनूजी वाळुंज, भाऊसाहेब बाळू होले, भाऊसाहेब मंजाबापू गडाख, अशोक सखाराम मुसमाडे, संजय सोपान बर्डे, राजेंद्र विठ्ठल ढुस, बाबासाहेब सांबारे, प्रभाकर महांकाळ, प्राचार्य – गुंड एम आर, उप प्राचार्य – आल्हाट जी एस., पर्यवेक्षक – काळे एन बी, शिक्षक प्रतिनिधी – भोसले डी एच, रायते एम डी, चौधरी डी के, शिंदे एस ए, उदमले यु एस, दरोडे डी एस, रामफळे जी के, कोरडे एस एच, कोरडे एस एल, कडूस पी डी, स्थायी सदस्य – चेअरमन देवळाली प्रवरा विविध कार्य सोसायटी, नगराध्यक्ष – देवळाली प्रवरा नगरपालिका, अध्यक्ष – अनंत नागरी सह पतसंस्था, अध्यक्ष – ग्राम सुधारणा मंडळ देवळाली प्रवरा, चेअरमन – बागायत पीक उत्पादक सोसायटी , संचालक – डॉ तनपुरे सह साखर कारखाना ली श्री शिवाजीनगर 
शाळा व्यवस्थापन समिती
अध्यक्ष – शेटे सोपान दगडू, उपाध्यक्ष – संसारे प्रकाश मार्शल, मुख्याध्यापक सदस्य – गुंड मोहन रखमाजी, उपमुख्याध्यापक – आल्हाट सुधाकर गणपत, पर्यवेक्षक – चव्हाण बाबासाहेब गेनूजी, पर्यवेक्षक – काळे नानासाहेब बाजीराव, सदस्य – वाळके शरद साहेबराव, मुसमाडे दिलीप सोपान, भांड सोपान मारुती, ढुस अरुण कोंडीराम, वाळके दिलीप विश्वनाथ, शिणारे संजय अण्णासाहेब, महिला सदस्य – घोडे शकुंतला गोपीनाथ, चव्हाण संगीता बाबासाहेब, विघे गीतांजली गणेश, शेख रिजवाना गनिभाई, सरोदे कमल दत्तू, विद्यार्थी प्रतिनिधी सय्यद इरफान अकील, खंडागळे श्रुती सर्जेराव आदी सदस्यांसह दोन्ही नियमबाह्य समित्या आज बरखास्त करण्यात आल्या असल्याचे ढुस यांनी सांगितले.

आता नवीन पदाधिकारी निवडताना पारदर्शकता हवीच. पण पालकांनी पालकसभेस उपस्थितीत राहुन योग्य प्रतीनिधी निवडावेत, जेणे करुन विद्यार्थ्यांचे हित साधले जाईल. असे हेल्प टीमच्या वतीने आप्पासाहेब ढुस यांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button