अहिल्यानगर
झाडे लावण्याबरोबरच माजी सैनिक त्याच्या संवर्धनासाठी देखील योगदान देत आहे -शिवाजी पालवे
जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने तपोवन रोड येथील शिवालय पार्क परिसरात वृक्षरोपण.
अहमदनगर प्रतिनिधी : माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने तपोवन रोड येथील शिवालय पार्कच्या परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. वृक्षरोपणाने अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सुहास ठिपसे, अॅड. संदिप जावळे, उद्योजक संतोष लबडे, जय हिंदचे शिवाजी पालवे, भाऊसाहेब देशमाने, शिवाजी गर्जे, कैलास पांडे, संजय पाटेकर, अनिल पालवे, नाना करांडे, ओम कर्नाटकर, गणेश क्षीरसागर, परमेश्वर बारकर, सिध्देश्वर माने, राहुल करांडे, अंबादास बडे, सुनिता नाटकर, स्वाती बरबडे, पुजा करांडे, जयश्री दरेकर, उषा करंडे, भैया दरेकर, ओंकार नाटकर, कैलास कानडे, मनोज झगरे, कुलकर्णी, रवी मुंगसे, रवींद्र आढाव आदी उपस्थित होते.
भगवान शंकराचे मंदिर असलेल्या शिवालय पार्कच्या परिसरात तीस विविध देशी झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांमुळे मंदिर परिसर हिरावाईने फुलणार आहे. प्रारंभी कुमारी सिध्दी चेमटे हिने आपल्या भाषणात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षरोपणाचे महत्त्व विशद केले. राहुल करांडे यांनी लावण्यात आलेल्या सर्व झाडांच्या संगोपणाची जबाबदारी स्विकारली.
जय हिंदचे शिवाजी पालवे म्हणाले की, फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील डोंगर रांगा व तिर्थक्षेत्र असलेल्या मंदिर परिसरात वृक्षरोपण व संवर्धनाची मोहिम राबविण्यात येत असून, या मोहिमेतंर्गत हजारो झाडे लावण्यात आली आहे. तर मागील वर्षी लावलेल्या झाडांचे उत्तमपणे संवर्धन करण्यात आले आहे. झाडे लावण्याबरोबरच माजी सैनिक त्याच्या संवर्धनासाठी योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुहास ठिपसे यांनी सिमेवरील जवानांमुळे देश सुरक्षित आहे. तर माजी सैनिकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी उचललेल्या पाऊलाने सजीव सृष्टी सुरक्षित राहणार असल्याचे सांगितले. भाऊसाहेब देशमाने यांनी कोरोनाने पर्यावरणासह ऑक्सिजनचे महत्त्व जगा समोर आनले. मनुष्याने काळाची गरज ओळखून या वृक्षरोपण मोहिमेत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. आभार मेजर शिवाजी गर्जे यांनी मानले.