अहिल्यानगर
राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग तालुकाध्यक्षपदी सौ.पुराणिक तर उपाध्यक्षपदी लहारे
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग राहुरी तालुकाध्यक्ष पदी सौ. दिपाली राजेंद्र पुराणिक यांची तर उपाध्यक्ष पदी रणजित मदन लहारे यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र सौ.दिपाली पुराणिक यांना देताना अभिनेते प्रकाश धोत्रे समवेत जिल्हाध्यक्ष श्याम शिंदे, कार्याध्यक्ष भगवान राऊत, अजय पवार, रत्नमाला मॅडम आदी.
राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभागाची कार्यकारिणी निवड बैठक जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथे पार पडली. राहुरी तालुक्यातील संघटक सिनेकलावंत राजेश मंचरे, सचिव संत महिपती चित्रपटाचे लेखक अनिस शेख, जिल्हा प्रतिनिधी शिफारस अजित येवले, सरचिटणीस एकनाथ पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रकाश दरंदले, संघटक अजिंक्य गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र आढाव, चिटणीस सौ.कोमल सावंत-टेकूडे, सदस्य नवनाथ पांढरे, सदस्य बाळासाहेब वराळे, सदस्य दिक्षा वाघ अशा पध्दतीने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना एकत्र करून राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभागामार्फत कलाकारच्या कुटुंबीयांनाचे प्रश्न व न्याय हक्क मिळवून देण्याचे कम संघटनेच्या माध्यमातून केले जातील. तसेच संघटन मजबूत करणासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मत नुतन अध्यक्षा सौ.दिपाली पुरणिक यांनी व्यक्त केले.