निधन वार्ता

भाऊसाहेब मुळे यांचे निधन

पैठण : तालुक्यातील ढोरकीन येथील रहिवासी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब माणिकराव पा. मुळे ( वय ६५ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने काल मंगळवारी पहाटे औरंगाबादेतील रुग्णालयात निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान उपचारांती त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर ढोरकीन येथे मंगळवारी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील दिग्गजांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, दोन सूना, एक विवाहीत मुलगी, जावाई, दोन भाऊ, दोन भावजया, पुतणे व नातवंडे आसा मोठा परिवार आहे. ते शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले यांचे मामा तथा संदिप व बद्री मुळे यांचे वडील होत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button