अहिल्यानगर
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील पूर्व भागात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गा मधून केली जात आहे.
व्हिडिओ : राहुरी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात वरुन राजाचे आगमनाने शेतकऱ्यांच्या कपाशी, सोयाबीन, बाजरी, उस या शेती व मिरची, वांगी, बटाटे, कांदा, कोबी, टोमॅटो, भेंडी, गवार, काकडी, भाजीपाला पिकांसह जनावरांना लागणारा हिरवा चारा घास, मका, गिन्नी गवत, चारापिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गा मधून केली जात आहे.
व्हिडिओ पहा :
गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शासनाने या वर्षी शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी._ भास्कर सप्रे, शेतकरी
व्हिडिओ पहा :
शेतकऱ्यांनी ४८ तासात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा, शासनाने सागितले. परंतु ऑनलाईन पंचनामे कसे करावे हे १० टक्के शेतकऱ्यांना देखील माहित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनामे करण्याचे मार्गदर्शन करावे._ धनंजय सप्रे, शेतकरी