मराठवाडा
तालुक्यातील या रस्त्यांचे कामे तातडीने मार्गी लावा- चंद्रवंशी पाटील
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील अतिशय महत्वाचा असलेला रस्ता कळमनुरी, माळेगांव, झरा, तुप्पा, नवखा, शिवनी, वाकोडी, गौळबाजार, गागापुर, वाई, तरोडा, धानोरा, परिसरातील गावे हे बाभळी ते येळेगाव तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी व दळणवळणाचा मुख्य रस्ता अतिशय खराब झाले आहेत. या रस्त्यांचे तातडीने कामे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजु चंद्रवंशी पाटील यांनी केली आहे.
कळमनुरी तालुक्यातील रस्ते अतिशय खराब झाले आहे. याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधींनी दोन वर्षापासुन लक्ष दिलेले नाही. अतिवृष्टीमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील संत तुकाराम महाराज, संत रामबापु यांच्या दर्शनासाठी एकादशी निमित्त येणार्या भावीकांना तसेच रोज दळणवळण करणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर वाहने चालवताना त्रास होत आहे, काहींना तर मनक्याचे आजार जडले आहे. रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत आहे. त्यामुळे प्रशासनाने बाभळी ते येळेगाव व बाभळीफाटा ते वाकोडी रस्त्यावर लक्ष देउन तात्काळ कामे करावी.
बाभळीफाटा ते वाकोडीला जाणार्या रस्त्यावर वाहने चालवताना रस्ता आहे की खड्डे हे चालकाला समजायला तयार नाही. वाकोडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे इमर्जन्सी पेशंट वाकोडी येथे नेण्यासाठी एक तासाचा कालावधी जातो इतकी भयानक या रस्त्यांची परिस्थिती आहे. पंचवीस खेड्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोडी येथे असल्यामुळे या ठिकाणी पेशंट मोठ्या प्रमाणात येतात. प्रशासनाने वाकोडीच्या रस्त्यांची दुर्दशा पाहून, रस्त्यांचे खड्डे न बुजवता, रस्त्याला निधी उपलब्ध करून, रस्त्यांचीीचांगली कामे तात्काळ करावी व प्रवासी, पेशंटला होणारा त्रास कमी करावा.