अहिल्यानगर
श्री क्षेत्र संगमेश्वर तिळापूर देवस्थान कडे जाणाऱ्या रस्त्यांबाबत अजित पवार व ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण मागे
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र संगमेश्वर तिळापूर देवस्थानाकडे जाणाऱ्या प्रलंबित रस्त्यांबाबत व विकासासाठी अजित पवार व ग्रामस्थांचे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण मागे घेतले आहे.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र आढाव, उपअभियंता अशोक पाटील, शाखा अभियंता हंचे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान व विकासाबाबत माजी खासदार प्रसाद तनपुरे प्रयत्न करीत असल्याची माहिती तसेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी परिसरातील वांजुळपोई सबस्टेशन मंजूर केल्याची व आमदार लहू कानडे यांनी मांजरी ते बोरीफाटा रस्त्यासाठी 75 लाख रुपये मंजूर केल्याची माहिती दिली.
3 किलोमीटर रस्त्यापैकी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद सदस्य महेश सुर्यवंशी यांच्या प्रयत्नातून 650 मीटर रस्त्यासाठी रु 20 लाख मंजूर झाले व उर्वरित रस्त्याचे 33 लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार झाले असून याबाबत लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. आमदार लहू कानडे यांचे बंधू अशोक कानडे, यांच्याशी भ्रमणध्वनी वरून लवकरच बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे.
यावेळी मा संचालक आप्पासाहेब जाधव, नानासाहेब जुंधारे, सरपंच सुधाकर जाधव, पुंजाभाऊ गरदरे, बाळासाहेब जाधव, एकनाथ पवार, अण्णासाहेब कोळेकर, नामदेव काकड, आप्पासाहेब काकड आदि उपस्थित होते.