अहिल्यानगर
हेल्प टीमच्या वतीने उपोषण जागेची पाहणी व नवीन मुख्याध्यापकांचे स्वागत
देवळाली प्रवरा : येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मधील अनधिकृत पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करून नियमानुसार समित्या स्थापन करणेसाठी हेल्प टीमचे सदस्य आप्पासाहेब ढुस हे दि. ७ ऑक्टोबर पासून घट स्थापनेच्या दिवशी शाळेसमोर आमरण उपोषनास बसणार आहे.
आज दि. ४ ऑक्टोबर रोजी हेल्प टीमचे आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, गिताराम बर्डे, ऋषिकेश संसारे, सागर सोनवणे, विजय कुमावत, अनिस शेख आदींनी शाळेला भेट देऊन उपोषण स्थळाच्या जागेची पाहणी केली व नूतन कार्यभार स्वीकारलेल्या मुख्याध्यापक विनोद अकोलकर यांना वृक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत केले. प्रसंगी उपमुख्याध्यापक गणपत आल्हाट उपस्थित होते.