अहिल्यानगर
शिवसेना स्टाईलने श्रीरामपूर जिल्हा करावा- राजेंद्र लांडगे
राहुरी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचे स्वप्न साकारण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवसेना स्टाईलने नगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा, असे प्रतिपादन श्रीरामपूर जिल्हा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या सौभाग्यवती आणि देवळाली नगरपालिका विद्यमान नगरसेविका सौ.सुनिताताई थोरात, पत्रकार विजय भोसले, आदित्य पाळंदे यांचे वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन राजेंद्र लांडगे बोलत होते. मविआ सरकारला जिल्हा विभाजन करणेची सुवर्णसंधी आहे. विभाजन झाल्यास श्रीरामपूर जिल्हा होऊन देवळाली तालुकाही होईल. शिवाय नवनविन उद्योगधंद्यांना चालना मिळेल. परिणामी सर्वसामान्यांच्या क्रयशक्तीत वाढ होईल असेही लांडगे शेवटी म्हटले आहे.
भिमतेज मित्र मंडळ आणि आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी कार्यकर्तांचा वेळोवेळी गुणगौरव झालाच पाहिजे या उपक्रमातर्गत भव्यदिव्य असे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. थोरात यांनी गावपातळी ते आरपीआय जिल्हाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास कसा खडतर केला याची अनुभूती उपस्थितांना सांगितली. एकदा तर आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले साहेबांच्या दलित पँथरच्या सभेसाठी अक्षरशः स्वतःहाचे घरदार विकून पैसे दिलेत. असा त्याग करुन थोरात कुटुंबीयांच्या अनेक आठवणींना उजाळा देत पक्षाची पुढील रणनीती कशी असावी याचेही मार्गदर्शन केले.
प्रसंगी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन, प्रकाश सोनी, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विष्णुपंत गीते, साई आदर्श मल्टीस्टेट अध्यक्ष शिवाप्पा कपाळे, पत्रकार मनोज हासे, राजेंद्र सांगळे, सुनील विश्वासराव, जावेद सय्यद, आरपीआयचे महिला जिल्हाध्यक्षा सिमाताई बोरुडे, राहुरी तालुकाध्यक्ष स्नेहलताई सांगळे, आदींनी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीसाठी नेल्सन कदम, अतुल त्रिभुवन, नंदु सांगळे, प्रविण पाळंदे, राजेंद्र साळवे, आशिष संसारे, छोटुभाई शेख, युसूफ शेख आदिंनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सचिन साळवे यांनी करून हसन सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.