अहिल्यानगर
धनराज गाडे यांच्या सहकार्याने वरवंडी येथे नेञ तपासणी शिबिर यशस्वी
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : तालुक्यातील वरवंडी गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्या माध्यमातून श्री हनुमान मंदिर येथे मोफत नेञ तपासणी, चष्मे वाटप, शिबिर मोठ्या उत्तम प्रतिसादासह संपन्न झाले.
वरवंडी येथे आयोजित केलेल्या या शिबिरात डोळे तपासणी करण्यात आले. नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या नेञ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी या शिबिरात 200 नागरिकांना मोफत चष्मे वाटप केले. 450 नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. सदर शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालक जालिंदर अडसुरे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप व उद्दिष्ट स्पष्ट केले. शेवटी आभार प्रदर्शन भाऊसाहेब कोळेकर यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरी तालुकाध्यक्ष सलीमभाई शेख, ग्रामपंचायतचे भाऊसाहेब कोळेकर, दिंगबर ताकटे, जालिंदर अडसुरे, कैलास ढगे, अरूण नन्नवरे, उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी वरवंडी गावातील जिल्ह्य परिषद शाळेस भेट देऊन मुलांच्या वह्या तपासणी केल्या.