छत्रपती संभाजीनगर

पिंपळवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त घेतली स्वच्छतेची शपथ

फोटो : पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे महात्मा गांधी यांची जयंती साजर करताना.

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायत येथे शनिवार, २ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती सरपंच मंदा विलास दहीहंडे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
याप्रसंगी सरपंच मंदा विलास दहीहंडे, उपसरपंच रहिम्मोद्दीन पठाण, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब गलांडे, बिलालभाई  शेख, मनोज थोटे, दादासाहेब चाबुकस्वार,  गोरख टेमक, लाला मोरे, लतुभाभी शेख, फौजी रियाजभाई, अंगणवाडी युनियनचे अध्यक्ष मिराबाई अडसरे, उषाताई  शेळके, नीता खडसन, अलका सोलाट, सखु दहिहंडे, शबाना सय्यद, अलका चाबुकस्वार, सरस्वती औटे, उल्का दिलवाले, सूनिता जैन, मीना गलांडे, ज्योती कर्डिले, मीना बनकर सह ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button