अहिल्यानगर
राहुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद याञा प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस परिवार सवांद यात्रा प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल राहुरी येथे पार पडली. या दरम्यान त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रसंगी राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्यातील मतदार संघातील प्रमुख समस्यांवर जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली.
मुळाधरणावरील मुळानगर वसाहत मधील कॉलनीतील घरे स्वतःच्या नावे करण्यासंबंधी तेथील रहिवासी लढा देत आहे. वरवंडी मुळानगर ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख यांनी तो मुद्दा काल जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या समोर मांडला. यावेळी ग्रामपंचायत प्रस्ताव सादर केला. तो प्रस्ताव ना.जयंत पाटील यांनी वाचून सही देखील केली. तसेच जलसंपदा नाशिक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना सूचना करून हा प्रश्न तात्काळ सोडवण्यास सांगितले.
तसेच वरवंडी मुळानगर ग्रामस्थांशी कटिबद्ध असणारे सलीम शेख यांनी फाटा ते मुळानगर कॉलनी या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी ना. तनपुरेंना केली होती. तो रस्त्याचा प्रश्न देखील ना. प्राजक्त तनपुरे यांनी जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून त्वरित मार्गी लावला आहे. लवकरच रस्त्याचे काम सुरू होणार आहे. मुळानगर कॉलनी घरकुल प्रश्न आणि फाटा ते मुळानगर रस्ता या दोन्ही प्रश्नांची सोडवणूक केल्याने ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही दोन्ही कामांना हिरवा कंदील दाखवला व मतदारसंघात नेहमीच जनतेचे प्रश्न सोडविणारे लोकप्रिय आमदार ना. प्राजक्त तनपुरे यांचेही ग्रामस्थांनी आभार मानले आहे.