गुन्हे वार्ता
साकुर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी मध्यरात्रि चोरट्यांनी शिंदोडी येथील माजी सरपंच उत्तमराव तात्याभाऊ कुदनर यांच्या मालकीचे असलेले साई किराणामॉल हे संपूर्ण पत्र्याचे बनविलेले आहे.
मागील बाजूचा पत्रा उचकाऊन चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि मोठ्याप्रमाणावर माल चोरून पोबारा केला. उत्तमराव कुदनर यांची मोठ्या प्रमाणावर चोरी झालेली असून आर्थिक नुकसान झालेले आहे. दुकानातील सी सी टि व्ही, डी व्ही आर फोडून चोरट्यांनी मालासह धुम ठोकली. त्याच प्रमाणे चोरांनी मल्हारी श्रीपती सोन्नर यांच्या मालकीची दुचाकी मोटार सायकल एम एच १४ डी व्ही ३९९५ पैशन प्रो चोरुन नेली. या घटनेने साकुर परिसरात भितीचे वातावरण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. पुढील तपास घारगांव पोलीस निरिक्षक सुनिल पाटील याांच्य मार्गदर्शनाखाली सुरू आहे.