साहित्य व संस्कृती

मुख्याध्यापिका मीना मंडोरे यांच्या सेवानिवृत्ती च्या गौरव ग्रंथाचा आदर्श दिशादर्शक-डॉ. वंदना मुरकुटे

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : उंबरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मीना मंडोरे यांचा सेवापूर्ती सोहळा म्हणजे त्यांच्या जीवनाची ज्ञान तपश्चर्या आहे, डॉ.रामकृष्ण जगताप यांनी “मीना मुख्याध्यापिका ” हा चरित्रगौरव ग्रंथ प्रकाशित केला. तो इतर शिक्षकांना दिशादर्शक ठरणारा असल्याचे मत श्रीरामपूर पंचायत समिती सदस्या डॉ.सौ.वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी व्यक्त केले.

येथील बेलापूर रोडवरील काळे रसवंती गृह परिसरात उंबरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मीना मंडोरे उर्फ सौ.मीना अरविंद कुंडलवाल यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न झाला, त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. वंदना मुरकुटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये होते. गटशिक्षणधिकारी साईलता सामलेटी, जि.प. सदस्य शरद नवले, केंद्रप्रमुख मंगल गायकवाड, उपसरपंच कांडेकर, राजेंद्र ओहोळ, सुनील काळे, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, डॉ. रामकृष्ण जगताप, उज्वला जगताप, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, मेघा साळवे, संघमित्रा रोकडे, रेहणा मुजावर, वैशाली थोरात, अरविंद कुंडलवाल, डॉ.कीर्ती कुंडलवाल, डॉ.दीपाली, गजानन, नूतन, स्वाती बेलदार, राहूल बनकर, संतोष भागडे, उत्तमराम दाभाडे, मेजर कृष्णा सरदार, बाबासाहेब गांगर्डे, शकील बागवान, संतोष जमदाडे, मेघा साळवे, संघमित्रा रोकडे, लता पालवे, संगीता फासाटे, कल्पना बाविस्कर, राजू इनामदार, विजय काटकर, अनिल ओहोळ, चंद्रकांत मोरे, बाबासाहेब मते, शाकीर शेख आदी उपस्थित होते.

प्रारंभी श्री सरस्वती माता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. “मीना मुख्याध्यापिका ” या पुस्तकाचे प्रकाशक, लेखक डॉ. रामकृष्ण जगताप यांनी पुस्तकाचा सविस्तर परिचय करून देऊन मुख्याध्यापिका मीना मंडोरे यांच्या हाताखाली शिक्षक म्हणून काम करण्याचे अनुभव सांगितले. आशा वाहुळ यांनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले. पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापिका मीना मंडोरे, अरविंद कुंडलवाल, डॉ.कीर्ती कुंडलवाल /भांगरे यांनी केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी जि.प. सदस्य शरद नवले, मंडोरे मॅडम, संगीता कटारे, उज्जवला जगताप आणि उपस्थितांना आपली पुस्तके देऊन सन्मान केला.

डॉ. वंदना मुरकुटे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, इंग्रजी शाळेतील बरीच मुले मंडोरेमॅडम यांच्या आदर्श नेतृत्वामुळे जिल्हा परिषद शाळेत आले. त्यांनी फार छान कार्य करून पुढील पिढीला दिशा दिली, आपण चांगलं पेरलं तर तेच उगवते आज त्यांची मुले आदर्श आहेत. साईलता सामलेटी आपल्या भाषणात म्हणाल्या, मुख्याध्यापिका मंडोरेमॅडम यांनी केलेलं शैक्षणिक काम इतरांना आदर्शवत आहे. एक महिला अधिकारी अनेकांना नको असतात पण मंडोरे मॅडम यांनी शाळेची गुणवत्ता वाढवून दाखवून दिले आहे की महीलासूद्धा किती सक्षम असतात.

अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, मुख्याध्यापिका मंडोरे यांनी मोठया कष्ठातून आपले जीवन घडविले आहे, त्यांचे वडील गवंडीकाम करीत असत गरिबीतही त्यांनी शिक्षण घेऊन शिक्षणक्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. डॉ. जगताप यांचे अभिनंदन करताना एका चांगल्या व्यक्तीचा चरित्र गौरवग्रंथ केवळ 15 दिवसात पूर्ण केला, हे अमृतकार्य टिकणारे आहे. मंडोरेमॅडम यांनी आत्मचरित्र लिहावे अशी अपेक्षा व्यक्त करून कविता सादर केली. डॉ.कीर्ती भांगरे, शिक्षकनेते विजय काटकर, मुख्याध्यापिका मीना मंडोरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. रामकृष्ण जगताप यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Articles

Back to top button