अहिल्यानगर
गोडसे शैक्षणिक कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित
संगमनेर/बाळासाहेब भोर : स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीचे माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले प्रकाश गोडसे सर यांना ज्ञानोदय बहुद्देशीय संस्था, टाकळीभान ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर या संस्थेचा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शैक्षणिक कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
शाल, श्रीफळ सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गणित, भूमिती, विज्ञान या विषयावर त्यांचं विशेष प्रभुत्व असून कडक शिस्त व योग्य मार्गदर्शनाने त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव झाल्यामुळे पेमगिरीतील नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.