अहिल्यानगर
जागतिक कन्या दिनी नारीशक्ती ही आदिशक्ती विषयावर व्याख्यान
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : भूमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने आज २६ सप्टे रोजी दुपारी १२ वाजता जागतिक कन्या दिनानिमित्त नारी शक्ती ही आदिशक्ती या विषयावर गुगल मिट कार्यक्रमात प्राचार्य अण्णासाहेब आवटे वरिष्ठ महाविद्यालय मंचर पुणे डॉ सीमाताई चव्हाण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमास अध्यक्षप्राचार्या सुजाता कालेकर, साधना मुलींचे महाविद्यालय हडपसर व प्रमुख उपस्थिती ग्रामीण साहित्यिक लेखक डॉ बाबुराव उपाध्ये, उपप्राचार्य भारतीय जैन संघटना वरिष्ठ महाविद्यालय वाघोली, यांची राहणार आहे. सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रा.कैलास पवार, भीमराज बागुल, बी आर चेडे, भाऊराव माळी, प्रा.शैलेंद्र भणगे आदींनी केले आहे.
खालील लिंकचा वापर करून आपण सहभागी व्हावे
Google Meet, click this link:
https://meet.google.com/ybz-krpa-voy
Or open Meet and enter this code: ybz-krpa-voy
असे आवाहन आयोजक : भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था महाराष्ट्र यांनी केले आहे.