अहिल्यानगर
बाभूळगाव येथे फळ झाडांना कलम करण्याचे प्रात्यक्षिक
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील विद्यार्थीनी कु.सुवर्णा भारत थोरात हिने ग्रामीण कृषी जागृकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 अंतर्गत राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकऱ्यांना आंब्याच्या झाडांना कलम करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी तिने शेतकऱ्यांना कलम करण्याचा योग्य कालावधी, कलम करण्याचे प्रकार व कलमाचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले व शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी शेतकरी रामदास चितळकर, सौ.सुनीता चितळकर, अरुण पाटोळे, सौ. कविता उंडे, बाळासाहेब खरमाळे, भारत थोरात व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी तिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अतुल दरांदले सर, कार्यक्रम समन्वयक प्रा एम.आर.माने सर, प्रा .सी.के.गाजरे सर, प्रा.पी बी.काळे मॅडम या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.