अहिल्यानगर

पुलाची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा रस्ता रोको श्री संत सावता माळी युवक संघाचा इशारा

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : अहमदनगर – वांबोरी या रस्त्यावर असलेल्या दगडी पुलाची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा श्री संत सावता माळी युवक संघाने दिला आहे.
एकोणिसाव्या शतकात अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारे पिंपळगाव माळवी तलाव इंग्रजांनी तयार केला असून या तळ्यावरील ओव्हरफ्लोचे पाणी अहमदनगर – वांबोरी या रस्त्यावर असलेल्या दगडी पुलावरून जात आहे.

हा पूल इंग्रज काळात तयार केला आहे. सध्या त्याची अतिशय दुरवस्था झाली असून या पुलाची निर्मिती झाल्यापासून आज पर्यंत त्याची कुठल्याही प्रकारची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली नाही. आज या पुलाची परिस्थिती अतिशय दयनीय झाली असून हा पूल रहदारीसाठी अतिशय धोकादायक बनला आहे.

तसेच पिंपळगाव तलावाच्या ओव्हरफ्लोचे पाणी या पुलावरून जाते त्यामुळे पुलावर गार्ड स्टोन च्या बरोबरीने पाणी असते. यामुळे या पुलाची डागडुजी करून पाण्याचा प्रवाह पुलाखालून करून द्यावा व बाजुचे झाडे काढून साफसफाई करून रस्त्यावर साचणारे पाणी रस्त्यावर साचणार नाही, अशी सुविधा करण्यात यावी.

श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, प्रसंगी नगर-औरंगाबाद रोडवर रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा अशोक तुपे यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button