अहिल्यानगर
विद्यार्थ्यांसाठी केंद्राने स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवावी
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करुन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवली पाहिजे अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी हर्षलबापू पाटील फदाट यांनी केली.
गेल्या दिड वर्षापासून शाळा, प्रशिक्षण संस्था , महाविद्यालय बंद आहेत. यामुळे विद्यार्थींचे खूप मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील लसीकरणाची जबाबदारी ही केंद्र सरकारने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना पुरवठा करत असून त्या पुरवठा नुसार लसीकरण चालू आहे. राज्य सरकार कडून होणारी लसींची मागणी व केंद्राकडून होणारा लसींचा पुरवठा यामध्ये सातत्याने तफावत आहे.
विद्यार्थी हे आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचे नुकसान आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे. त्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे असे मत विद्यार्थी प्रतिनिधी हर्षलबापू पाटील फदाट यांनी व्यक्त केले.