अहिल्यानगर
रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : सात्रळ-रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, बापुजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय व कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती कोव्हिड-१९ चे नियम काटेकोरपणे पाळून साजरी करण्यात आली.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड. विजयराव कडू पाटील, स्कूल कमिटी सदस्य जनार्दन दिघे, माजी प्राचार्य लालचंद असावा यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कर्मवीर जयंतीच्या या छोटे खानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड विजयराव कडू पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत संकुलाचे प्राचार्य अशोक वानखेडे सर यांनी केले. माजी प्राचार्य लालचंद असावा आणि सेवानिवृत्त पर्यवेक्षक पोपटराव पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी पर्यवेक्षक भास्कर गोसावी, ज्येष्ठ पत्रकार अशोकराव गोसावी, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.निबे मॅडम, माजी विद्यार्थी दिपक पलघडमल तसेच रयत संकुलाचे सर्व सेवकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिराज मन्सुरी यांनी केले. तर पर्यवेक्षक सिताराम बिडगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्रजी पवारसाहेब आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या व्याख्यानाचा लाभ सर्व सेवकांनी घेतला. अशा पद्धतीने कर्मवीर जयंती समारंभ यशस्वीपणे संपन्न झाला.