छत्रपती संभाजीनगर
सरस्वती भुवन येथे नविन शैक्षणिक धोरण कार्यशाळा संपन्न
विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत संस्थेच्या आवाहनानुसार नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा मोठ्या उत्साहात घेण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, पर्यवेक्षक राजेंद्र कोठावदे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरस्वती भुवन प्रशाला औरंगाबादचे सहशिक्षक धनंजय जोशी व श्रीमती रूपाली पाटील उपस्थित होते. प्रशालेच्या वतीने प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ यांनी केले. दोन सत्रात ही कार्यशाळा संपन्न झाली. पहिल्या सत्रात श्रीमती रूपाली पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व ओघवत्या भाषाशैलीत कौशल्य व मूल्य याविषयी मार्गदर्शन केले तर दुस-या सत्रात धनंजय जोशी यांनी ब्लूमचे श्रेणीबद्ध वर्गीकरण व कौशल्य याविषयावर मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक शिक्षिका यांनी गट करून कार्यशाळेत कृतियुक्त सहभाग घेतला. शेवटी उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ यांनी आभार मानले.