शिक्षणवारी ज्ञान पंढरी

कर्मवीर जयंतीदिनी आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सत्कार

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष असणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणाचे महामेरू कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वडाळा महादेव येथे कर्मवीर यांनी शिक्षक व मान्यवरांन अभिवादन केले. त्यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रीय अभियान केंद्र, लोकरंग बहुउद्देशीय संस्था वडाळा महादेव, करिअर कॉम्पुटर श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.


त्यात आदर्श शिक्षक-बाळासाहेब कासार, श्रीमती दिपाली सोनावणे व लिपिक सुनिता बोरावके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच इयत्ता १० वी मध्ये प्रथम आलेले श्रावणी थोरात, प्रतीक्षा पंडित, सानिया पठाण या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, ट्रॉफी व पुस्तकांचा संच देऊन साहित्यिक, लेखक, मिराबक्ष शेख, कवी आनंदा साळवे, पत्रकार रफिक शेख, उद्धवराव पवार आदींनी पुरस्काराने सन्मानित केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर मुख्याध्यापक कन्हेरकर, मिराबक्ष शेख, कवी आंनदा साळवी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्धवराव पवार, विशाल, सचिन पवार, कृष्णा पवार, राजेंद्र देसाई, चेडे आदी उपस्थित होते. सूत्र संचालन सौ. कडभने व आभार प्रदर्शन डी एन थोरात यांनी केले.

Related Articles

Back to top button