अहिल्यानगर

कर्मवीर भाऊराव पाटील हे ग्रामीण भागाचे पहिले ज्ञानर्षी : पत्रकार प्रकाश कुलथे

श्रीरामपुर (बाबासाहेब चेडे ) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागासाठी समर्पित होणारे पहिले ज्ञानर्षी असल्याचे मत महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134वी जयंती “साहित्यचर्चा आणि आजचे शिक्षण” या विषयाच्या परिसंवादातून साजरी करण्यात आली त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश कुलथे बोलत होते, अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. स्नेहप्रकाश प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. स्नेहलता कुलथे, दैनिक स्नेहप्रकाशचे कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या सचिव सौ.आरती उपाध्ये यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करून कर्मवीर हे आमच्या परिवाराचे खरे ज्ञानतीर्थ असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे प्रकाश कुलथे यांचा सत्कार डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी शाल, बुक, बुके देऊन सत्कार केला, सौ. स्नेहलता कुलथे आणि स्वामीराज कुलथे यांचा सत्कार वाचन संस्कृतीच्या कोषाध्यक्ष सौ.मंदाकिनी उपाध्ये यांनी केला.

सौ. कुलथे आणि स्वामीराज कुलथे यांनी कर्मवीर हेच आमच्या जीवनातील ज्ञानप्रकाश असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे प्रकाश कुलथे म्हणाले, कर्मवीर हे दुर्लक्षित, डोंगरदऱ्या आणि दीनदुर्लबांच्या झोपडीपर्यंत जाणारे पहिले ग्रामीण भागातील ज्ञानज्योती पेटविणारे पहिले ज्ञानपीठ होते कारण त्याअगोदर फक्त शहरी भागातच ही शिक्षण चळवळ ठराविक वर्गापुरती मर्यादित होती. 04ऑक्टोबर 1919रोजी स्थापन झालेल्या या संस्थेत पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मी या शिक्षण संस्थेत घेतलेले शिक्षण संस्कार कधीच विसरू शकत नाही असे सांगून जनता हायस्कुल, बोरावके कॉलेजमधील आठवणी सांगितल्या.

अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, कर्मवीरांनी संस्था स्थापन केली म्हणून आमच्यासारख्या पोरक्या, ग्रामीण दुर्लक्षित पोरांचे शिक्षण कमवा आणि शिका या योजनेतून झाले. प्रा. विजयराव कसबेकर, प्रा. एस. सी. पाटील, प्रा. सौ. मंगल पाटील, प्राचार्य खरात, नामेमॅॅडम, सुरेखाताई चौगुले अनेक प्राध्यापक, मान्यवर व्यक्तींनी निराधारला आधार दिला. बोरावके होस्टेला आणि कॉलेज हेच आपले जीवन घडविणारे तीर्थस्थळ असल्याच्या आठवणी सांगितल्या. निर्मिक उपाध्ये,नील कुलथे यांनी कर्मवीर प्रतिमा पूजन केले. सौ. आरती उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Articles

Back to top button