कृषी

पैठण व फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सेहगल फाऊंडेशनच्या वतीने प्रशिक्षण

 

शेतकऱ्यांला कमी खर्चात अधिक उत्पादन,जमिनीचा पोत उत्तम कसा राखावा, कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातुन शेतीवरील खर्च कमी करुन शेती उत्पादन वाढविने हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन कृषी ई. मागिल दोन वर्षांपासुन औरंगाबाद जिल्ह्यात सातत्याने प्रयत्न करीत आहे अशी माहीती सेहगल फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रमुख विष्णू खेडकर, महींद्रा कंपनीचे रीजनल मॕनेजर सचिन सैदाने व दिपक लालवानी यांनी दिली.

फुलंब्री तालुक्यातील निधोना याठिकाणी आयोजित प्रशिक्षण वर्गाला जिल्हा प्रकल्प समन्वयक योगोश शिंगारे, पैठण तालुका काॕडनेटर राजपाल सोनकांबळे व संदिप पाचफुले यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुक्यातील संजय गरड,सतिश श्रीसुंदर,प्रभाकर तांबे,शिवाजी बोबडे,अदीनाथ कवळे,दशरथ शिरवत, किरण कोल्हे, बाळु बोबडे, राजु बनकर, रामेश्वर दिलवाले यांच्यासह पैठण तालुक्यातील अन्य १५ शेतकरी तसेच फुलंब्री तालुक्यातील १६ प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करुण त्यांना शेतीच्या अधिक उत्पादनवाढी साठी प्रशिक्षण देण्यात आले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button