अहिल्यानगर

शेततळ्यात बुडून लहान तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) : तालुक्यातील कान्हेगाव येथील शेत तळ्यात बुडून लहान तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असुन या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बाबत समजलेली माहीती अशी की, चैतन्य अनिल माळी वय १२ वर्ष, दत्ता अनिल माळी वय ८ वर्ष, चैतन्य शाम बर्डे वय ४ वर्ष ही तीन लहान मुले खेळता खेळता कान्हेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेत तळ्याजवळ गेली.
पावसाचे पाणी या तळ्यात साचलेले होते. त्यामुळे पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही व हे तिनही मुले पाण्यात बुडून मयत झाले. ही घटना परिसरात पसरताच ग्रामस्थ गोळा झाले. तिनही मुलांचे शव बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी श्रीरामपुर येथे पाठविण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button