अहिल्यानगर

शिवशंभु छावा प्रतिष्ठान व समता ब्लड बँक नाशिक यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

राहुरी प्रतिनिधी : राहुरी फॅक्टरी मंगल‌ कार्यालय येथे बुधवार दि. २९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी 11:00 वा. शिवशंभु छावा प्रतिष्ठान व समता ब्लड बँक नाशिक यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर सोहळा आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे तर उद्घाटक म्हणून लोकप्रिय आमदार निलेश लंके उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम श्रीरामपूर महानगर पालिका नगराध्यक्षा तथा श्री साईबाबा संस्थान शिर्डी विश्वस्त अनुराधाताई आदीक,श्री साईबाबा संस्थान शिर्डी विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट फेडरेशन अध्यक्ष सुरेश वाबळे, शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भरत भाऊ पवळे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अहमदनगर जिल्हा शिवशंभु छावा प्रतिष्ठान यांनी केले आहे.
तुळापुर : शिवशंभू छावा प्रतिष्ठाणला बुधवार दि. २२ सप्टेंबर २०२१ रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे. वर्षपुर्ती निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने २२ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमास मा. न्यायमूर्ती वसंतराव पाटील, आमदार दिलीपराव मोहिते, पुणे जि.प. अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे, मुंबई हायकोर्टाचे ॲड. संतोष शिंदे, ॲड. गणेश सांडभोर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे वर्पे, खेड शिवसेना प्रमुख रामदास धनवटे, उपप्रमुख बापुसाहेब थिटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वर्षपुर्ती निमित्त तुळापुर येथे धर्मवीर छञपती संभाजी महाराज यांची आरती व महापुजा, ज्योत प्रस्थान व कार्यकर्त्यांची भव्य भगवी मोटार सायकल रॅली, कोयाळी भानोबाची येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत व सत्कार, शेलपिंपळगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत व सत्कार, दौंडकरवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत व सत्कार, शरददावडी ग्रामस्तांच्या वतीने स्वागत व सत्कार, संभाजीनगर (निमगाव) येथे स्वागत व धर्मवीर छञपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व मानवंदना, कार्यक्रम स्थळी ज्योतपुजण, महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुजा, मान्यवरांचे सत्कार, मार्गदर्शन, सांगता समारंभ असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सर्व पदाधिकार्यांनी न चुकता या शिवकार्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन शिवशंभू छावा प्रतिष्ठाणने केले आहे.

Related Articles

Back to top button