अहिल्यानगर

वारकरी साहित्य परिषदेचा नियुक्ती पत्र प्रदान सोहळा संपन्न

ताहाराबाद येथे वारकरी साहित्य परिषदेचा मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान सोहळा संपन्न 

आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव :  वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात षरिषदेच्या माध्यमातून वारकरी कार्य चालू आहे. राहुरी तालुक्याची कार्यकारणी काकाजींच्या सांगण्यावरून व महंत उध्वजी महाराज मंडलिक यांचे आज्ञेने नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष ह भ प श्रीकांतजी महराज गागरे व उपाध्यक्ष ह भ प सचिनभाऊ ढुस यांचे नियोजनात श्री क्षेत्र ताहाराबाद येथे हा छोटे खानी कार्यक्रमास संत महीपती महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून सुरूवात करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकारी :
कार्याध्यक्ष : ह भ प आण्णा महाराज गागरे
सचिव : ह भ प शिवाजी महाराज खडके
खजिनदार : ह भ प नामदेव महाराज जाधव
सहखजिनदार : ह भ प बाबासाहेब महाराज कोळसे
सदस्य : ह भ प नामदेव महाराज क्षीरसागर, ह भ प बापुसाहेब महाराज भुसे, ह भ प प्रमोद महाराज रोकडे, ह भ प शुभम महाराज भांड, ह भ प महेश महाराज लांबे, ह भ प रमेशभाऊ नलगे, ह भ प अक्षय महाराज जुंदरे, ह भ प भागवत महाराज टेकाळे आदींना नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले.
ह भ प बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ह भ प महेश महाराज खाटेकर, नवनाथ महाराज आहेर, ह भ प सांबारे काका, यादवभाऊ, जय तुळजाभवानी ग्रुप तांदूळवाडी चे अध्यक्ष भाऊसाहेब पेरणे, राहुरी तालुका युवानेते उपाध्यक्ष अविनाशभाऊ पेरणे, गोरखबाबा मोरे, योगेश पेरणे, मच्छिंद्र राऊत, क्षीरसागर माऊली आदि उपस्थित होते.  उपाध्यक्ष सचिनभाऊ ढुस, महेश महाराज खाटेकर, आण्णा महाराज गागरे, नामदेव महाराज जाधव, बाळकृष्ण महाराज कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Back to top button