शिक्षणवारी ज्ञान पंढरी
आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्या : महेश पाडेकर
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : आदिवासी भागात बिकट परिस्थितीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसेच आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विविध अडचणींचा सामना करून अतिदुर्गम, डोंगराळ, संवेदनशील भागात आपल्या जीवाची पर्वा न करता अतिशय प्रामाणिकपणे व तळमळीने शैक्षणिक स्तर उंचावण्याचे कार्य करतात.
महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन म्हणून विविध लाभ दिले आहे. परंतु प्रत्येक जिल्ह्यात त्यांची अंमलबजावणी शासकीय अधिकारी करत नाही. त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवले जाते. त्याची तक्रार शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील, संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, ज्युनियर कॉलेज युनिटचे राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, जालिंदर सरोदे, राज्य सचिव सुनील गाडगे यांच्याकडे अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे सरचिटणीस महेश पाडेकर व सोमनाथ बोनंतले यांनी तक्रार केली होती. एकच काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वेतन दिले जाते. तसेच आदिवासी भागात शाळा आहे. परंतु त्याच संस्थेची दुसरी शाळा बिगर आदिवासी भागात नसेल तर त्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदिवासी भागात मिळणारी एकस्तर वेतनश्रेणी काम करूनही दिली जात नाही, काही जिल्ह्यात सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून एकस्तर वेतन श्रेणी बंद केली, काही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना फक्त ६ वर्षच एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ मिळतो तर काहींना काहीच मिळत नाही, आश्रम शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना फक्त बारा वर्षे एकस्तर वेतनश्रेणी मिळते तर शासन निर्णयानुसार काही प्राथमिक शिक्षक उच्च न्यायालय मुंबई येथे न्याय मागण्यासाठी गेले असता त्यांना आदिवासी भागात कार्यरत असेपर्यंत एकस्तर वेतनश्रेणी द्यावी असा आदेश दिला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागात एकच काम करूनही वेगवेगळे वेतन दिले जाते अशी तक्रार केल्यानंतर आमदार कपिल पाटील यांनी ज्या शिक्षकांना आदिवासी भागात अडचणी आहेत त्यांच्या निवेदनावर सह्या घेऊन 30 सप्टेंबर 2021 पर्यंत माझ्याकडे द्याव्यात व त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच आदिवासी भागात काम करताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानसिक स्थैर्य टिकूवून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार कपिल पाटील यांनी दिले.
त्यांना न्याय मिळावा या हेतूने शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सरचिटणीस महेश पाडेकर, हिशोब तपासणी सोमनाथ बोनंतले, दत्तात्रय घुले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात आदिवासी भागातील अकोले तालुक्यात निवेदनावर सह्यांची मोहीम सुरु केली. याप्रसंगी आदिवासी आश्रमशाळा संघटनेचे नेते विठ्ठल म्हशाळ, तान्हाजी खराटे, संजय जाधव, बुरके शिवाजी, दराडे जी.के., दत्तात्रय कासार, गणेश फटांगरे, दगडू टकले, रवींद्र गायकवाड, टकले चंद्रशेखर, नवले वृषाली आदी मान्यवर उपस्थित होते.