अहिल्यानगर

जवळे कडलग येथे विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

जवळे कडलग येथे विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन इंद्रजितभाऊ थोरात व रामहरी कातोरे यांच्या शुभहस्ते संपन्न

संगमनेर शहर/ आशिष कानवडेमहसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जवळे कडलग येथे वडाचा रस्ता डांबरीकरण व मजबूतीकरण व जवळे कडलग ते चिखली रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण, आढळेश्वर मंदिरा करीता संरक्षण भिंत या कामाचे उदघाटन व भूमिपूजन कारखाना संचालक इंद्रजितभाऊ थोरात व जिल्हा परिषद तथा नियोजन समिती सदस्य रामहरी कातोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी स. म. भा. थो. स. सा. का. संचालक चंद्रकांत पाटील कडलग, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, बाबासाहेब सुर्वे, राजेंद्र कडलग, सरपंच सतिश पथवे, उपसरपंच निलेश कडलग, कैलास अण्णा देशमुख, भास्कर शेळके, नानासाहेब वामन, सर्व ग्रा.प.सदस्य आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button