अहिल्यानगर

भूमी फाऊंडेशन निबंधस्पर्धेत सोनाली सोनवणे,प्रा.पांडुरंग औताडे, प्रा. पांडुरंग पवार प्रथम

श्रीरामपुर (बाबासाहेब चेडे ) : भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेतर्फे महात्मा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्यस्तरीय निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तीन विषय ठेवण्यात आले होते. प्रत्येक विषयात सर्वप्रथम क्रमांक काढण्यात आले. त्यामध्ये सोनाली विजय सोनवणे, प्रा.पांडुरंग औताडे श्रीरामपूर, प्रा. पांडुरंग पवार यांनी सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केले असल्याची माहिती फौंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष संयोजक प्रा. कैलास पवार यांनी दिली.


भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात उत्कृष्ट रित्या उपक्रम राबवित आहे. ग्रामीण भागात जलसंधारण, वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, ग्रामीण आरोग्यविषयक प्रबोधन मेळावे, आरोग्य शिबिरे, शिक्षणसुधारणा आणि मदत, कोविड महामारीच्या काळात श्रीरामपूर, पुणे भागातील तृतीय पंथीय नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, किराणा किट्स वाटप, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील निराधार महिला मुले यांना संसार उपयोगी वस्तू वाटप, महापुरात नुकसानग्रस्त भागात जाऊन जीवनावश्यक वस्तू वितरण, निराधार विदयार्थ्यांना मदत, तृतीयपंथी समाज यांना कोरोनाच्या काळात अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तू आणि त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी विशेष प्रयत्न केले असे अनेक उपक्रमाबरोबर साहित्य पुरस्कार, लेखन, वाचन पुरस्कार देण्यात पुढाकार घेण्यात आला असल्याची माहिती प्रा. कैलास पवार यांनी दिली.

मार्गदर्शक माजी प्राचार्य टी.ई.शेळके, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा. डॉ. बाळासाहेब मुरादे, प्रा. शिवाजीराव बारगळ, सुखदेव सुकळे, बाबासाहेब चेडे, भीमराज बागुल इत्यादींनी यासाठी विशेष योगदान दिले, असे प्रा.पवार यांनी सांगितले.


राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सोनाली सोनवणे यांनी “महामारी आणि आरोग्यमंत्र ” प्रा. पांडुरंग औताडे नेवासा यांनी “भूमी फौंडेशनचे कार्य ” आणि प्रा.पांडुरंग पवार भारतीय जैन संघटना महाविद्यालय वाघोली पुणे यांनी ” महात्मा गांधींचे विचार ” या विषयावर निबंधलेखन केले होते. या निबंधस्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ.शिवाजी काळे, सौ. संगीता अशोकराव कटारे तर बक्षीस वितरण 02 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता श्रीरामपूर येथे मार्केट यार्ड वॉर्ड नंबर सहा येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थित होईल. तसेच निराधार, गरीब वृद्धांना श्रवणयंत्रांचे संस्थेच्या वतीने मोफत वाटप होणार आहे असे प्रा. कैलास पवार यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button