ठळक बातम्या

पेन्शनधारकांचे गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : इपीएस 95 पेन्शन धारकांचा पेन्शनवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. देशाचे गृहमंत्री अमितजी शहा हे दिनांक 17 सप्टेंबर ला नांदेड येथे विमानतळावर आले असता त्यांचे स्वागत नांदेड महानगर भाजपा अध्यक्ष प्रविण साले यांनी केले. या स्वागत प्रसंगी इपीएस 95 पेन्शन धारकांचा प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

त्यावेळी राष्ट्रीय संघर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष एस. एन. अंबेकर यांनी प्रविण साले यांना संघटनेचे निवेदन गृहमंत्री अमितजी शहा यांचे पर्यंत पोहचिण्यासाठी विनंती केली. त्यानुसार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे सहीचे निवेदन व त्यांचे पत्र अमितजी शहा यांना त्यांनी सादर केले. यावेळी साले यांनी गृहमंत्री यांचेकडे दोन विषयाची मागणी केली आहे. त्यात एक मागणी ही EPS पेंशन धारकांना सन्मानजनक निवृत्ती वेतन देण्यात यावे अशी होती.

यावेळी नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर उपस्थित होते. देशभर संघटनेचे प्रयत्न सुरु असल्याने व पंतप्रधान यांनीही आश्वासन दिल्याने प्रश्न लवकर मार्गी लागेल अशी पेन्शन धारकांना अपेक्षा आहे.

Related Articles

Back to top button