अहिल्यानगर
ग्रामीण रुग्णालय आणि तुकडे बंदी विषयावर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ – ना. तनपुरे
राहुरी प्रतिनिधी : देवळाली प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालय आणि तुकडेबंदी विषयावर संबंधित मंत्री महोदयांसोबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आप्पासाहेब ढुस यांचेशी चर्चा करताना सांगितले.
राहुरी येथे आज दि. १८ सप्टेंबर रोजी आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने देवळाली प्रवरा येथील प्रलंबित ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न आणि तुकडेबंदी तुकडे जोड कायद्यातील किरकोळ बदल या विषयावर राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन हे प्रश्न सोडविणेसाठी विनंती केली. त्या प्रसंगी ना. तनपुरे यांनी हा प्रश्न संबंधित खात्याचे अधिकारी आणि मंत्री महोदय यांचेशी लवकरच बैठक घेऊन सोडविणेत येईल असे सांगितले व तात्काळ बैठकीचे नियोजन करणेसाठी स्विय सहायक यांना सूचना दिल्या.