अहिल्यानगर
शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्तपदी ॲड. सुहास आहेर यांची नियुक्ती
संगमनेर शहर प्रतिनिधी : क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेरचे सदस्य, संगमनेर वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष तसेच राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांचे विश्वासु असलेले ॲड. सुहास आहेर यांची श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या विश्वस्तपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.
या निवडीचे संगमनेर च्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष निखिल पापडेजा, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष गौरव डोंगरे, युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस भागवत कानवडे, सुहास वाळुंज, आशिष कानवडे, ऋत्विक राऊत, शेखर सोसे व युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.