अहिल्यानगर
पाथरे येथे प्रवरा नदी पात्रात ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील पाथरे येथे प्रवरानदी पात्रात नव्याने पाणी आल्याने ग्रामस्थांच्या वतीने जलपूजन करण्यात आले आहे.
पाथरे येथे प्रवरानदी पात्रात साडी,चोळी, खन, नाराळाने प्रवारा माईचे पुजन करून कोरोना लवकर जावो यासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी सरपंच निता घारकर, उपसरपंच हिराबाई टेकाळे, कामगार तलाठी सुवर्णा शिंदे, शिवसेनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार, गिताराम घारकर, शरद पठारे, तुकाराम जाधव, सचिन काळे, श्रीकांत जाधव, श्रीधर जाधव, ज्ञानेश्वर गावडे, अजित गावडे, अर्जुन गांगुर्डे, कल्याण महाराज जाधव, रणछोडदास जाधव, विजय जाधव, सतीश साहणे, बाबासाहेब जाधव, राजेंद्र घारकर, पप्पू पवार, ज्ञानेश्वर टेकाळे आदींच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.