अहिल्यानगर

कांदा व्यापाऱ्याची चौकशी करून परवाना रद्द करा; मनसे आक्रमक

आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या राहुरी बाजार समिती मधील कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्याची कशी फसवणुकी केली ? या फसवणूकीतील संबंधित व्यापाऱ्याच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचे चित्र राहुरी तालुक्यात दिसून येत आहे.


याचाच एक भाग म्हणून आज दि. १४ सप्टेंबर रोजी मनसेच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना संबंधित व्यापाऱ्याचा दुकान परवाना रद्द करण्याबाबत शहराध्यक्ष प्रतिक विधाते यांच्या पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास राहुरी बाजार समिती येथे उपोषण करण्याचा इशारा उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण यांच्या वतीने देण्यात आला आहे. त्याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, मनसे शहाराध्यक्ष प्रतिक विधाते, मनवीसे तालुकाध्यक्ष सागर माने, नवनाथ शेडगे आदींच्या शिष्टमंडळाने राहुरी चे तहसीलदार शेख यांची भेट घेत केली आहे.

Related Articles

Back to top button