आरोग्य
बेलापुर बु. येथे मोफत मोतीबिंदु निदान शिबीराचे आयोजन
बेलापूर प्रतिनिधी : भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.के.आय (बुधरानी) हाॅस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने काळे हाॅस्पिटल, गणपती गल्ली, बेलापुर बु. या ठिकाणी बुधवार दि.१५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ५४ वे मोफत मोतीबिंदु निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या मोफत मोतीबिंदू निदान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भागवत प्रतिष्ठान, बेलापुर बु।।, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगरचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे यांनी केले आहे. पेशंटने शिबीरास येताना आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, कोरोना चाचणी (RTPCR) रिपोर्ट सोबत आणावे, असे म्हटले आहे.