अहिल्यानगर
बायो इंधन क्षेत्रात तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार-रंजीत दातीर
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : येथील जीतशीर प्रोड्युसर कंपनी बायो इंधन क्षेत्रात तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार असे मत कंपनीचेे संस्थापक अध्यक्ष रंंजीत दातीर यांनी व्यक्त केले. असे सांगून ते म्हणाले, आपणच आपले गाव आणि आरोग्यशील जीवन सुरक्षित ठेण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यासाठी कार्यरत असलेल्या जीतशीर प्रोड्युसर कंपनीच्या जैविक इंधननिर्मिती प्रकल्पासाठी योगदान द्यावे, सभासद व्हावे असे आवाहन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रंजीत दातीर यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर गावात जीतशार प्रोड्युसर कंपनीतर्फे ” जैविक इंधननिर्मिती आणि शेतकरी कल्याण ” याविषयी प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना रंजीत दातीर बोलत होते, अध्यक्षस्थानी सरपंच सोन्याबापू शिंदे होते. प्रारंभी ग्रामो उद्दोजक नानासाहेब दत्तात्रय नांगळ यांनी स्वागत केले. प्रमुख वक्ते अर्थतज्ञ प्रा. डॉ. बबनराव आदिक, प्रमुख पाहुणे साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, राजेंद्र येळवंडे, ग्रामो उद्दोजक धनंजय काळे, उपसरपंच मुसा पाटील, पत्रकार संदीप जगताप, सुरेश लांडगे, बाळासाहेब देसाई आदींसह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. संयोजक सोन्याबापू शिंदेसर यांनी प्रास्ताविक केले. साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये आपल्या भाषणात म्हणाले, 1873 ला महात्मा फुले यांनी ” शेतकऱ्यांचा आसूड ” ग्रंथ लिहून शेतकरी, ग्रामीण जीवनाचे सर्वांगीण उपाय सांगितले, पण ते आपण केले नाहीत, 1920 साली महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला सांगितले. कारण भारत हा खेड्यांचा देश आहे, खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी जीतशार प्रोड्युसर कंपनी जैविक इंधननिर्मिती करणार आहे, यामुळे आपले अर्थकारण आणि आरोग्य सुरक्षित होणार आहे, असे सांगून त्यांनी “बायो इंधननिर्मिती ” कविता सादर केली.
प्रा. डॉ. बबनराव आदिक यांनी सांगितले की, गावात श्रीगणेशाचे आगमन झाले आहे, श्रीगणेश हे विद्यारूप आहे, आपला विचार जागा करणे, गाव, कुटुंब, आरोग्य, अर्थकारण आणि शेतशिवाराचे भले करायचे असेल तर इंधनाच्या बाबतीत आपण स्वावलंबी झाले पाहिजे. 98 टक्के इंधन आपण आयात करतो. त्यामुळे आपले जीवन आणि अर्थकारण बिघडले आहे, असे सांगून त्यांनी अमेरिका, जर्मनी इतर देश, प्रदूषण, रासायनिक खते असे संदर्भ देत प्रबोधन केले. आपणच आता जागे होऊ आणि कंपनी सभासद होऊ असे आवाहन केले. रंजीत दातीर यांनी आपल्या कंपनीचे फायदे आणि भविष्यातील आरोग्यशील जीवनाचे संदर्भ सांगून शेतकरी प्रश्न सोपे करून सांगितले. अध्यक्ष भाषणात सरपंच सोन्याबापू शिंदे यांनी रंजीत दातीर यांनी आपल्या हितासाठी ही कंपनी सुरु करणार आहेत त्यासाठी केवळ 110रुपये भरून आपण सभासद व्हावे असे आवाहन केले. यावेळी विजय नाणेकर, अरुण शिंदे, प्रताप शिंदे, कैलास हुडे, गणेश चव्हाण, जालिंदर शिंदे, पोपट गायकवाड, सोमनाथ शिंदे, आप्पा गुंड, माणिक देसाई, अभिजित शिंदे, किशोर त्रिभुवन, विजय शिंदे, संदीप जगताप, सुरेश लांडगे, बाळासाहेब देसाई इत्यादी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ग्रामस्थांना पुस्तके देऊन रंजीत दातीर, डॉ. बबनराव आदिक यांच्या हस्ते सन्मान केले. सोन्याबापू शिंदेसर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामो उद्दोजक नानासाहेब नांगळ यांनी आभार मानले.