अहिल्यानगर

शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेना अध्यक्षपदी निकम

राहुरी शहर प्रतिनिधीशानाडर (लार्सन अँड इब्रो) इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. अहमदनगर येथे 10 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत विजय पॅनलचे प्रमुख मधुकर निकम यांची अहमदनगर युनिट अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. युनिट उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरुडे, ज. सेक्रेटरी कृष्णा गोंडळ, खजिनदार उमेश पाटोळे, अनिल बेरड ,धनंजय तांदळे, विठ्ठल कोतकर यांची कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आली.


भारतीय कामगार सेना अध्यक्ष माजी मंत्री सेना उपनेते खासदार अरविंद भाई सावंत, उपाध्यक्ष अजित साळवे, कंपनी हेड अरविंद पारगावकर यांनी मधुकर निकम व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

Related Articles

Back to top button