कृषी

केंदळ बुद्रुक येथे ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक

महसुल विभागामार्फत ई-पीक पाहणी प्रशिक्षण देताना कामगार तलाठी राहुल कराड.

आरडगाव प्रतिनिधी / राजेंद्र आढाव : केंदळ बुद्रुक येथील विरभद्र माध्यमिक विद्यालयात ई-पीक पाहणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात शेतकरी, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट रोजी ई-पीक पाहणीचा शुभारंभ केला असुन आता शेतकऱ्यांना स्वतः आपल्या सातबाऱ्यावर पिकांची नोंद करता येणार आहे. यासाठी शासनाने ई-पीक ॲप तयार केले आहे. शेतकरी हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करु शकता. हे ॲप कसे वापरावे, याचे प्रशिक्षण नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी ई-पीक ॲप डाउनलोड केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ तारडे, सरपंच गोविंद जाधव, मंडळ अधिकारी मेहेत्रे रावसाहेब, मुख्याध्यापक शेळके सर, शिक्षक वृंद, पोलीस पाटील प्रल्हाद तारडे, कोतवाल सखाहरी इंगळे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button