अहिल्यानगर
दृढीकरणप्रसंगी स्विकारलेली श्रद्धा भक्कमच रहावी : फा. थोमस डिकोस्टा
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) : हरिगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे आज मतमाउली जन्मोत्सव पूर्वी दृढीकरण संस्कार”या विषयावर प्रवचन करताना फा थोमस डिकोस्टा यांनी प्रतिपादन केले की दृढीकरण व मरीयामाता या विषयावर अज्कॅहा विषय आहे. दृढीकरण म्हणजे ह्या दिवशी आपला बाप्तिस्मा झाला. त्या दिवशी परमेश्वराने आपल्याला पवित्र दान दिलेले आहे. श्रद्धा दिलेली आहे. श्रद्धा जी आहे ती दृढ करण्यासाठी आपल्याला दृढीकरण करावे लागते.
आज मरिया मातेचा जो विश्वास होता. तो तिने दृढ केलेला आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे होवो, हा विश्वास तिने जगामध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे. विश्वास हे दान आहे, देणगी आहे. देणगी अशी आहे ती परमेश्वराने दिली आहे. ज्या वेळी आपण विश्वास ठेवतो. श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वर विश्वास ठेवो. आपण जे काय करतो ते पूर्ण होत असते. कारण देवावर जर विश्वास ठेवला तर आपल्याला कधीच काही कमी पडत नाही. ह्या विशासमध्ये तीन गुण आहेत.
ज्ञान म्हणजेच आपल्याला बायबलचे ज्ञान हवे. हे फार महत्वाचे आहे. ज्ञान हे आपण बायबलमधून आपण शिकायला पाहिजे. दुसरे म्हणजे आपल्याला दिलेले ख्रिस्तसभा त्यात आपण जे काही ऐकतो, ते अमलात आणायचे आहे. परिस्थितीत सुद्धा ज्ञान घेतो. दुसरे घटक ते म्हणजे”प्रीती”ईश्वरावर प्रीती करणे, बंधुप्रेम करणे, जनसेवेव्दारे शेजाऱ्यावर प्रीती करणे, हे आपले एक प्रकारचे कर्तव्य आहे. तिसरे श्रद्धेचे घटक आहे ते म्हणजे प्रेशितीय कार्य ते म्हणजे माझे तारण झालेले आहे. मी सुद्धा भविष्यामध्ये श्रद्धा ठेवून दुसर्याचे तारण यासाठी मी प्रयत्न करायला पाहिजे, स्वर्ग आणि पृथ्वी त्याचे एकुलते एक पुत्र त्यासाठी सुंदर म्हटलेले आहे. कुमारी मरीयेपासून प्रभू येशू जन्मला, या आईचा जो विश्वास होता. त्या आईने जो विश्वास दिलेला आहे. हा विश्वास आपल्यामध्ये यावा म्हणून प्रार्थना करू या. त्याचे उदाहरण म्हणजे आज हजारो लोक मरीयेच्या चरणी येत आहेत दर्शन घेतात. अथांग जनसागर आपल्या माउली कडे येत आहे. कारण मारिया ही श्रद्धेची महान चिन्ह आहे. जिने विश्वास ठेवला तिने या जगात देवाच्या पुत्राला आणले व सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जन्मापासून ते मरेपर्यंत मरीयेने आपला विश्वास ढळू दिला नाही. कारण तिच्या बरोबर पवित्र आत्मा होता. मारिये पवित्र आत्मा तुझ्यावर छाया करेल व जो पुत्र तुझ्याव्दारे होईल तो देवाचा पुत्र आहे. या श्रद्धेने तिने जीवन पूर्ण केले आहे. आई ही आपल्याला मार्गदर्शन करणारी आहे. आपण सुद्धा आपली श्रद्धा जी आहे ती दृढ करू या. जी आपण श्रद्धा बाप्तीस्माप्रसंगी स्वीकारली आहे दुर्ढीकरण दिवशी ती भक्कम केली आहे व आज भक्कमच राहू दे दुसऱ्याची श्रद्धा आपण वाढवावी यासाठी प्रार्थना करू या.
आजच्या नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी सहभागी होते. १० सप्टेंबर रोजी रुग्नाभ्यंग संस्कार या विषयावर फा. संतोष साळवे यांचे प्रवचन होईल व ११ सप्टे रोजी सणाचा मिस्सा व प्रवचन नासिक धर्मप्रांत महागुरूस्वामी लूरडस डानियल यांचे प्रवचन दुपारी १२ वा. होईल. हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन प्रसारित होत असल्याने भाविकांनी घरी राहून भक्ती व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख धर्मगुरु सुरेश साठे यांनी केले आहे.