अहिल्यानगर
कामगार संघटना शहर अध्यक्षपदी कुमावत
देवळाली प्रवरा : विश्वकर्मा बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेच्या देवळाली प्रवरा शहर अध्यक्षपदी विजय बाळासाहेब कुमावत यांची निवड झाल्याबद्दल देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम च्या वतीने वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई च्या वतीने बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण कल्याणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी व कामगारपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहचवण्याचे काम ही संघटना करणार असल्याचे यावेळी कुमावत यांनी सांगितले.
त्या प्रसंगी हेल्प टीम चे दत्तात्रय कडू पाटील, आप्पासाहेब ढुस, अनिस शेख, ऋषीकेश संसारे, सागर सोनवणे, खालिद शेख, दिपक संसारे, राजेंद्र ओहोळ, गोरख सरोदे, सुभाष गाडेकर आदी उपस्थित होते.