अहिल्यानगर

भाजपा युवा मोर्चाचे कानवडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

संगमनेर शहर : संगमनेर भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा सावरचोळचे मा. ग्रामपंचायत सदस्य सागर मारुती कानवडे यांचा वाढदिवस अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
कानवडे यांना आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहे. सागर कानवडे हे त्यांच्या कार्याने सावरचोळ व पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. शासकीय कामांचा पाठपुरावा करणे, गोरगरीब जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. किसान क्रांती मोर्चा चे अध्यक्ष सतीशराव कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कानवडे सामाजिक कार्यात पुढे असतात. बिरोबा देवस्थान क वर्ग साठी पाठपुरावा असो वा स्मशानभूमी साठी पाठपुरावा सागर कानवडे यांनी नेहमीच गावाच्या विकासाला प्राधान्य दिले असे गावच्या सरपंच सौ अनिताताई संपत कानवडे यांनी बोलताना सांगितले.
सर्वच राजकीय पक्षात मैत्रीपूर्ण संबंध जपत सामाजिक कार्यात अग्रेसर असे सांगत अकोले तालुक्याचे युवानेते पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सतिशराव कानवडे, भाजपा युवा मोर्चा संगमनेर अध्यक्ष शैलेंद्र फटांगरे, सुरेशभाऊ पथवे, संजय कोल्हे, संपतराव कानवडे, भाऊसाहेब कानवडे, योगेश डूबे, शिवसैनिक संकेत कोल्हे, मारुती मेंगाळ, कांताराम मेंगाळ, नवनाथ मेंगाळ, गोरख डोखे, पोपट मेंगाळ, राजू उघडे, मनोहर गोर्डे, देविदास मेंगाळ, लहू जाधव, सुदाम पिंगळे, राजेंद्र मेगाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button