अहिल्यानगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयात क्रांतिकारक उमाजी नाईक यांना अभिवादन
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयात आद्यक्रांतीकारक तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी राजे उमाजी नाईक यांच्या 188 जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे व संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी डॉ. मिलिंद अहिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. महावीरसिंग चौहान यांनी उमाजी नाईक यांच्याविषयी माहीती सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. चारूदत्त चौधरी, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. किर्ती भांगरे, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. मनोज गुड, सहाय्यक अधिक्षक शेळके व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.